महिलांना खरंच 4500 रुपये मिळणार का?, कारण…

आदिती तटकरे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांना लाभ मिळाला आहे. यामध्ये तब्बल 4 हजार 878 कोटी रूपयांचे वाटप केल्याची माहिती आहे. 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 50 हजार महिलांचे अर्ज बाद झाल्याची माहिती आहे.

 

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव

 

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता (Third Installment) जमा व्हायला सूरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात (Women Account) हे पैसे जमा झाले आहेत, तर अनेकांच्या खात्यात पैसे जमा व्हायचे बाकी आहेत. असे असतानाच तब्बल 50 हजार महिलांचे अर्ज हे बाद ठरले आहेत. या बाद ठरलेल्या अर्जदारांना योजनेचा लाभ मिळणार का? या महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहेत का? हे जाणून घेऊयात.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांना लाभ मिळाला आहे. यामध्ये तब्बल 4 हजार 878 कोटी रूपयांचे वाटप केल्याची माहिती आहे. 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 50 हजार महिलांचे अर्ज बाद झाल्याची माहिती आहे. पण अर्ज बाद झाला तरी महिलांनी चिंता करण्याची गरज नाही, कारण त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी असणार आहे.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव

ज्या महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आले आहेत. त्या अर्जदार महिलांना त्या संबंधित कारण देखील वेबसाईटवर सांगितले गेले आहे. त्यामुळे त्या संबंधित दुरूस्ती करून महिलांना अर्ज पुन्हा सबमिट करता येणार आहेत. अनेक प्रकरणांमध्ये महिलांनी त्यांचे बँक अकाऊंट टाकले नाही. तसेच जे बँक अकाऊंट टाकले आहे? ते आधारशी लिंक नाही आहे. तर अनेक प्रकरणात कागदपत्रे नीट अपलोड करण्यात न आल्याने अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले होते.

आता ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले आहेत. त्या महिलांना संबंधित दुरूस्ती करून घ्यायची आहे. या दुरूस्तीनंतरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. जर तुम्ही ऑगस्ट दरम्यान अर्ज केले आहेत आणि तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल, तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकूण 4500 तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

‘इतक्या’ लाडक्या बहिणी ठरल्या लाभार्थी
”मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव

Leave a Comment