अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
राशन कार्ड
अर्ज दार शेतकरी असने आवश्यक आहे
आठ अ चा उतारा
या योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांच्यासाठी पक्या गोठ्याचे बांधकाम करण्यात येईल.
या योजनेअंतर्गत 2 ते 6 गुरांसाठी एक गोठा बांधण्यात येईल त्यासाठी 77188/- रुपये अनुदान दिले जाईल.
6 पेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच 12 गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाईल.
12 पेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजेच 18 गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी तिप्पट अनुदान देण्यात येईल.
गुरांकरिता 26.95 चौ.मी.जमीन पुरेशी धरण्यात आली आहे तसेच त्याची लांबी 7.7 मी. आणि रुंदी 3.5 मी.असेल
गव्हाण 7.7 मी. X 0.2 मी. X 0.65 मी. आणि 250 लीटर क्षमतेचे मूत्रसंचय टाके बांधण्यात येतील.
जनावरांना पिण्याच्या पाण्याची 200 लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बांधण्यात येईल.
सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठयांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील.