लडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात, यादीत नाव पहा September 17, 2024 by Vinod लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म आता मंजूर होण्यास चालू झालेले आहेत. जर हा फॉर्म तुम्ही भरला असेल आणि तुमचा फॉर्म मंजूर झाला किंवा नाकारला गेला किंवा त्याच्यात काही बदल करण्यास सांगितण्यात आले आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने तुमचा अर्ज चेक करा. 👇👇खालील व्हिडिओ पहा👇👇 आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सध्या चर्चेत आहे. 21 ते 65 वर्षे वयोगटातील अल्प उत्पन्न गटातील पात्र महिलांना राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेतून दरमहा रु. 1500 ची आर्थिक मदत करणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. गुडन्यूज! लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार, रक्षाबंधनाला खात्यात 3 हजार रुपये जमा होणार! लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलै होती. मात्र, अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारने (Maharashtra Government) या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत, त्यावरुन 16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तर 1 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. साधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होईल.